Kalyan : कल्याण हादरले! पोलिस ठाण्याबाहेरच रक्तरंजित हल्ला; महिला आणि तिच्या भावावर चाकू व दगडाने जीवघेणा प्रहार

Kalyan : कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोटाच्या वादातून संतप्त सासरच्यांनी महिला आणि तिच्या भावावर पोलिस ठाण्याबाहेरच चाकू व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वालधुनी परिसरात राहणाऱ्या रुक्सार हिचा तिच्या पती तन्वीर खानसोबत घटस्फोटाचा वाद सुरू होता. यासंदर्भात दोन्ही कुटुंबीयांमध्ये चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीदरम्यान वाद चिघळला आणि रुक्सारला मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली.

घटनेनंतर रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम तक्रार नोंदवण्यासाठी महात्मा फुले पोलिस ठाण्याकडे गेले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, पोलिस ठाण्याबाहेरच आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. चाकू आणि दगडाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी दोघांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली, तर आरोपी त्यांचा पाठलाग करत आवारापर्यंत पोहोचले होते.

या हल्ल्यात रुक्सार आणि अस्लम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आणि महिलेचा पती तन्वीर खान याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील इतर आरोपी—सासरा आणि दीर—फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Kalyan : कल्याण हादरले! पोलिस ठाण्याबाहेरच रक्तरंजित हल्ला; महिला आणि तिच्या भावावर चाकू व दगडाने जीवघेणा प्रहार

Leave a Reply to Gertrude3584 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *