Jharkhand Encounter News: झारखंडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

Jharkhand Encounter News: झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेजवळ ही चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर नक्षलविरोधी अभियान सुरु केले आहे. या अभियानामध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी यांच्यासह पलामू आणि चत्राच्या जिल्हा सुरक्षा दलाचा समावेश आहे. या अभियानादरम्यान सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

चतरा पोलिसांनी या चकमकीमध्ये असलेला स्पेशल एरिया कमिटीचा कमांडर गौतम पासवान, अजीत उरांव उर्फ चार्लिस, अमर गंझू, नंदू आणि संजीत भुइया यांना ठार केले. चकमकीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गौतम पासवान याच्यावर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर अमर गंझूवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी एक नक्षलवादी बिहारचा तर इतर नक्षलवादी हे झारखंडचे राहणारे होते. नक्षलवाद्यांच्या इतर साथीदारांचा शोधण्यासाठी जंगलात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply