Jaykumar Gore : भीषण अपघातात जखमी झालेले भाजप आमदार पुन्हा 'रूबी'मध्ये दाखल;

बिजवडी (सातारा) : गेल्या दोन दिवसांत दगदग झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात आलं आहे.

फलटण इथं गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात आमदार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रूबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनं बोराटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आलं होतं.

काल आणि आज प्रवास, तसंच खूप दगदग झाल्यानं त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. रूबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आमदार गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा पुण्याला हलविण्यात आलं. दोन दिवसांत आमदार गोरेंना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. हालचाल वाढल्यानं त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होऊ लागल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असं आवाहन सोनिया गोरे यांनी केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *