पुणे :  हातउसने पैसे परत न केल्याने महिलेचा विनयभंग ; एका विरोधात गुन्हा; कोथरूडमधील घटना

पुणे : हातउसने दिलेले पैसे परत न दिल्याने महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलीप मरळ (रा. वारजे) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मरळ आणि तक्रारदार महिला ओळखीचे आहेत. मरळने महिलेला काही महिन्यांपूर्वी हातउसने पैसे दिले होते. महिलेने पैसे परत केले नव्हते. त्यामुळे मरळने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेचा विनयभंग करुन तिची बदनामी केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *