Jamner Crime News : पत्नी व अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या; गावी येत पतीनेही संपविले जीवन

Jamner Crime News : पती आणि पत्नीमध्ये रोजच वाद होत होते. याच वादातून पतीने पत्नीसह अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. यानंतर पतीने दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हि धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे १२ एप्रिलला घडली. 

देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथील पोलिस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाला होता. पतीला मद्याचे व्यसन असल्यामुळे पती- पत्नीमध्ये नेहमी वाद होत. परंतु पतीचे दारूचे व्यसन जास्तच झाल्यामुळे प्रतिभा पतीला सोडून अकरा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु प्रतिभाने त्यास नकार दिला होता. 

Shirpur Accident : मजुरांनी भरलेली गाडी उलटली; मुलीचा मृत्यू, १९ जखमी

दरम्यान प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल प्रतिभाला घेऊन जाण्यासाठी व तिची समजूत काढण्यासाठी आला असता प्रतिभाने नकार दिला. या मुळे दोघांमध्ये वाद झाला. यातून विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व मुलगी दिव्या या दोघींचा गळा चिरून हत्या करून तिथून फरार झाला. प्रतिभाच्या आई, वडिलांना माहिती मिळताच त्यांनी घरी धाव घेतली. त्यांना आपली मुलगी व नात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply