Jammu Kashmir : बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार, कंडीच्या जंगलात शोधमोहीम सुरू...

Jammu Kashmir : बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. राजौरीच्या कांडी जंगलात ही चकमक सुरूच आहे. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद झाले होते.

बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे, काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

Follow us -

दुसरीकडे राजोरीच्या कांडी जंगलात चकमक सुरू आहे. एन्काउंटर ऑपरेशन सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आगे. जंगलाचा परिसर इतका घनदाट आहे की ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

PAFF ने पुन्हा जबाबदारी घेतली

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने राजोरी येथे पाच जवानांच्या हौतात्म्याची जबाबदारी स्वीकारली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply