Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे दोघांचा मृत्यू; १२ जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा

Jammu and Kashmir:जम्मू आणि काश्मीरमध्ये काल मध्यम स्वरुपात हिमस्खलन झाले आहे. यात १२ जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी जम्मू -काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात हिमस्खलन झाले आहे. कुपवाडा येथे येत्या २४ तासांमध्ये २ हजार मिटर उंचभागात हिमस्खलन होण्याचा इशारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथे झालेल्या हिमस्खलनात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणत्याही मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले नाही अशी माहिती मिळाली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास गुरेझ येथील जुन्नियल या गावात देखील हिमस्खलन झाले. गुरुवारी गांदरबल जिल्ह्यात सोनमर्ग येथे हिमस्खलन झाले. यात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) झालेले हिमस्खलन लक्षात घेता उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यासाठी हिमस्खलनाचा अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये डोडा, रामबन, किश्तवाड, बारामुल्ला, बांदीपोरा, गांदरबल, रियासी, आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम हिमस्खलन होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच २ हजार मिटरवर असलेल्या रियासी, किश्तवाड, डोडा, बांदीपोरा, पूंछ, गांदरबल, बारामुल्ला आणि रामबन येथे सौम्य हिमस्खलनाचा धोका वर्तवला आहे. पुढचे २४ तास २,००० मीटरपेक्षा उंच असलेल्या राजौरी, अनंतनाग, कुलगाम या जिल्ह्यांसाठी अधिक महत्वाचे असणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना स्वत:ची काळजी घेत हिमस्खलन भागात जाण्याचे टाळा असे सांगितले आहे. तसेच जास्त गरजेचे असल्यासच घराबाहेर पडा असेही सांगण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply