मुंबई : गणेश नाईकांना दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीस ठाणे सत्र न्यायालयानं आज नकार दिला. या प्रकरणी २७ एप्रिलला सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. त्यामुळं गणेश नाईक यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

गणेश नाईक यांच्याबाबात दोन प्रकरण ठाणे कोर्टात आहेत. यांपैकी एक प्रकरण रिव्हॉल्वरची भीती दाखवून धमकावल्याचं आहे. तर दुसरं प्रकरण हे बलात्काराचं आहे. ही दोन्ही प्रकरणं एकाच कोर्टात हस्तांतरीत करण्यात यावीत अशी मागणी नाईक यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आली होती.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *