
Jalna Accident News: जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भक्तीभावाने मांगिरबाबाच्या यात्रेला निघालेल्या कुटुंबियावर अचानक काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने बसवर दगडफेक करत काचाही फोडल्याची माहिती आहे.
विजय कौतीकराव जाधव (वय ३५ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे. तर वैभव जाधव हा १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे
प्राप्त माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील जाधव कुटुंब आज १८ एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेसाठी निघाले होते. ७ ते ८ जणांचे एकत्रित कुटुंब मोठ्या उत्साहाने यात्रेसाठी जात असताना जालन्याजवळ समोरून येणाऱ्या बसने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भयानक होता की या अपघातात मॅक्झिमा चालक विजय कौतीकराव जाधव (वय ३५ वर्ष) हे जागीच ठार झाले. तर गाडीमधील ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्याच्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष गेले आणि एकच धावपळ सुरू झाली.
आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर बस दुभाजकावर जाऊन आदळली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
- चियाचा बाजार पुन्हा तेजीत! वाशीम मार्केटमध्ये दरात मोठी उसळी; पुन्हा २० हजारांचा टप्पा गाठणार का? शेतकरी उत्सुक!
महाराष्ट्र
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
- वरळी-नायगावचा विकास, मग शिवडी का रखडली? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मंजुरीअभावी शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ठप्प; ९६० कुटुंबांचा जीव टांगणीला!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
गुन्हा
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- होर्मुझमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय! क्षेपणास्त्रांना चकवा देत भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर; १५ जहाजे अजूनही सुटकेच्या रांगेत!


























Subscribe to my channel
