पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि कथित गैरव्यवहाराविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पूल परिसरात १ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. दरम्यान, बेकायदेशीर जमाव जमवणे, चिथावणीखोर वक्तव्ये करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी १५ आंदोलक विद्यार्थ्यांवर थेट प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला आहे. पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक झाले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तांवर जोरदार घणाघात: विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. "पुणे सीपी (पोलीस आयुक्त) साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा थेट आणि अत्यंत तीक्ष्ण सवाल उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार तात्काळ पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.
"विद्यार्थ्यांना सोडून माझ्यावर गुन्हे दाखल करा": फरासखाना पोलीस ठाण्यात पत्रकारांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलताना रोहित पवार म्हणाले:
-
"गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुले ही महाराष्ट्राचे भविष्य आहेत. सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या या तरुण-तरुणींना आतंकवादी, दहशतवादी किंवा गुप्तहेर ठरवणाऱ्या पोलिसांचा आणि या सरकारच्या कृतीचा मी जाहीर निषेध करतो."
-
"एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या नात्याने मी स्वतः या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आणि सत्याग्रहात सहभागी झालो होतो. त्यामुळे जर पोलिसांना गुन्हे दाखल करण्याची एवढीच हौस असेल, तर या निष्पाप विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने रद्द करा आणि त्याऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करा!"
एफआयआरमधील गंभीर त्रुटींवर बोट: रोहित पवार यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या (FIR) प्रतींमधील गंभीर आणि हास्यास्पद त्रुटींकडे लक्ष वेधले.
-
त्यांनी आरोप केला की, जे विद्यार्थी आंदोलनस्थळी उपस्थितच नव्हते, त्यांची नावेही खोट्या गुन्ह्यांमध्ये टाकण्यात आली आहेत.
-
एफआयआरमध्ये महिला आंदोलकांना पुरुष आणि पुरुष आंदोलकांना महिला दाखवण्यासारखा ढिसाळपणा करण्यात आला आहे. "असा चुकीचा आणि निष्काळजी एफआयआर बनवणारा पोलीस अधिकारी स्वतः पेपर फोडून किंवा डमी बसवून भरती झाला आहे का?" असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
सरकारवर दबावतंत्राचा आरोप व तीव्र आंदोलनाचा इशारा: हा सर्व प्रकार म्हणजे गृहविभाग आणि राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी आणि त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी सुरू असलेले कृत्य असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. "हे सर्व गुन्हे जामीनपात्र असून आम्ही आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची मोठी फौज उभी केली आहे," असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की paper leak आणि भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससी अध्यक्षांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे. सरकारने तातडीने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात दिल्लीतील आंदोलनापेक्षाही तीव्र आणि व्यापक संघर्ष उभा राहील, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




