
IPL 2024 playoff scenarios : इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी (16 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार होता. मात्र हैदराबादला गुरुवारी सातत्याने पावसाची धार सुरू असल्याने हा सामना रद्द करण्यात आला.
या सामन्यात एकही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक पाँइंट वाटून देण्यात आला. यामुळे आता हैदराबादचे 15 पाँइंट्स झाल्याने त्यांनी प्लेऑफचे तिकीट मिळवले.
त्यामुळे आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेळ करणारा हैदराबाद तिसरा संघ ठरला. हैदराबादपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता केवळ प्लेऑफमधील एक जागा शिल्लक आहे.
या एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे चार संघ शर्यतीत आहेत. पण त्यातही दिल्ली आणि लखनौ यांच्यासाठी केवळ गणितीय समीकरणानुसार हे आव्हान कायम आहे. कारण दिल्लीचे सर्व 14 साखळी सामने खेळून झाले असून त्यांचे 14 पाँइंट्स आहेत.
मात्र, त्यांचा नेट रन रेट चेन्नई आणि बेंगळुरूपेक्षा कमी आहे. तसेच लखनौचा एक सामना बाकी आहे, त्यामुळे तेही 14 पाँइंट्सपर्यंत पोहचू शकतात. पण त्यांचाही नेट रन रेट बाकी संघांपेक्षा कमी आहे.
|
आरसीबीची प्रयत्नांची शर्थ सुरुच, पण 'प्लेऑफ'मध्ये स्वदेशी ते परदेशी मातब्बर कोणीच स्थान देईना! |
याचमुळे सध्या सर्वाधिक चुरस चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात आहे. विशेष म्हणजे हे दोन संघच त्यांचा अखेरचा साखळी सामना 18 मे रोजी खेळणार आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ निश्चित करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.
जर या सामन्यात चेन्नईने कोणत्याही फरकाने विजय मिळवला, तरी ते प्लेऑफमध्ये थेट प्रवेश करतील. कारण जर विजय मिळवला, तर तो चेन्नईचा 8 वा विजय असेल, त्यामुळे ते 16 पाँइंट्स मिळवतील. पण जरी पराभूत झाले, तर चेन्नईला प्लेऑफची संधी असणार आहे.
मात्र, त्यांना याची काळजी घ्यावी लागेल की बंगळुरू 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 11 चेंडू राखून जिंकणार नाही. पण जर बेंगळुरूने 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून विजय मिळवला, तर बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरतील. कारण मग त्यांचे आणि चेन्नई 14 पाँइंट्ससह बरोबरीवर असतील, मात्र बेंगळुरूचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असेल.
दरम्यान, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर या सामन्यातही पावसाचा अडथळा आला आणि सामना रद्द झाला, तर चेन्नई प्लेऑफसाठी 15 पाँइंट्ससह पात्र ठरतील, तर बेंगळुरूचे आव्हान संपेल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

