IPL 2022: सीएसकेच्या मोईन अलीला मिळाला व्हिसा मात्र…

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला व्हिसा मिळाला नसल्याने तो चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 15 व्या हंगामाचा (IPL 2022) सलामीचा सामना खेळू शकणार नव्हता. मात्र क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मोईन अलीला दीर्घ प्रतिक्षेनंतर व्हिसा मिळाला आहे.मोईन आलिने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात जवळपास महिनाभर आधी व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला वेळेत हा व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे तो 26 मार्च रोजी होणाऱ्या आयपीएल हंगामाच्या सलामी सामन्याला मुकावे लागणार होते.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आज म्हणजे 24 मार्च रोजी मोईन अलीला व्हिसा मिळाला आहे. याबाबत मोईन अलीचे वडील मुनिर अली यांनी सांगितले की, मोईन अलाली विजा मिळाला आहे.' तर सीएसकेचे सीईओ कैसी विश्वनाथन यांनी सांगितले की, 'उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. तो मुंबईत संध्याकाळपर्यंत पोहचेल. त्यानंतर तो थेट विलगीकरणात जाईल.'

विश्वनाथन पुढे म्हणाले की, 'जरी मोईन अली भारतात दाखल होत असला तरी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही. मात्र आम्हाला मोईन अलीच्या व्हिसाबाबत निर्माण झालेला संभ्रम संपल्याचा आनंद आहे.' मोईन अलीच्या व्हिसाचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्याच्या वडिलांना आश्चर्य व्यक्त केले होते. मोईन अली हा सातत्याने भारतात येतोय त्यामुळे त्याच्या व्हिसाबाबत झालेली दिरंगाई ही धक्कादायक असल्याचे मत वडिलांनी व्यक्त केले होते.

मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्जने लिलावापूर्वीच रिटेन केले होते. त्याला फ्रेंचायजीने 8 कोटी रूपये देऊन रिटेन केले. याचबरोबर सीएसकेने रविंद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी) यांना देखील रिटेन केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply