आयपीएलच्या 15 व्या हंगामात सर्वाधिक लक्ष हे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे असणार आहे. त्याने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरची ही त्याची पहिलीचआयपीएल असणार आहे. त्याच्या डोक्यावरचा कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट आता उतरला असल्याने तो फलंदाजीत आपल्या जुन्या लयीत परतण्याची अपेक्षा चाहते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस हा विराट कोहलीचा उत्तराधिकारी असणार आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विराट कोहली पुढच्या वर्षी पुन्हा आरसीबीचा कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अनेक वर्ष महत्वाचा भाग असलेल्या फाफ ड्युप्लेसिसला आरसीबीने यंदाच्या लिलावात 7 कोटी रूपयाला खरेदी केले. याचबरोबर त्यांनी त्याला आपल्या संघाचे कर्णधार देखील केले. मात्र आरसीबीच्या या निर्णयावर काही लोकांनी शंकाही उपस्थित केली. कारण फाफ ड्युप्लेसिस हा 37 वर्षांचा खेळाडू आहे. त्याचा सध्या तरी फिटनेस तगडा असला तरी तो फार काळ आरसीबीसाठी उपयुक्त ठरेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आरसीबीसाठी तो दीर्घ काळचा कर्णधार होणे शक्य नाही.
दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्याआर अश्विनने याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'त्याला कर्णधार करण्याचा चांगला निर्णय आरसीबीने घेतला. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तसेच त्याच्या नेतृत्वावर धोनीची छाप देखील पहावयास मिळेल.फाफ ड्युप्लेसिसची आयपीएल कारकिर्द ही उतरणीला लागली आहे. तो अजून दोन ते तीन वर्षे खेळू शकतो. '
अश्विन पुढे म्हणाला की, 'मला असे जाणवते की विराट कोहलीवर गेल्या काही वर्षापासून कॅप्टन्सीचा चांगलाच ताण होता. या वर्षी तो कॅप्टन्सीमधून ब्रेक घेईल. माझा असा अंदाज आहे की आरसीबी त्याला पुढच्या वर्षी पुन्हा कर्णधार करेल.' विराट हा आरसीबीचा 2013 पासून कर्णधार आहे हे अश्विनने अधोरेखित केले. विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार असताना फलंदाज म्हणून खोऱ्याने धावा केल्या. मात्र त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. आता आरसीबी या हंगामात कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
शहर
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
- शेअर बाजारात सोमवार ठरला 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
- पुण्यात गुंडांचा थरार! पोलिसांवरच थेट गोळीबार; ऊसाच्या शेतात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
महाराष्ट्र
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- NEET पेपर लीक प्रकरण: लातूरमध्ये 'सीबीआय'ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मोटेगावकर क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ताब्यात
- नागपुरात गुन्हेगारीचे सावट; महाल परिसरात गोळीबाराचा थरार, तर एमआयडीसीत ४ दिवसांत दोन अंगावर काटा आणणाऱ्या हत्या
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
गुन्हा
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- NEET पेपर लीक प्रकरण: लातूरमध्ये 'सीबीआय'ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मोटेगावकर क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ताब्यात
- नागपुरात गुन्हेगारीचे सावट; महाल परिसरात गोळीबाराचा थरार, तर एमआयडीसीत ४ दिवसांत दोन अंगावर काटा आणणाऱ्या हत्या
- कृषी विभागाची मोठी कारवाई! जालन्यात अवैध खतांचा काळाबाजार उघड; तब्बल १८ लाखांचा खतसाठा जप्त
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.






















Subscribe to my channel




