India vs Sri Lanka Match: नवख्या वेलालागेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; श्रीलंकेला दिलं अवघ्या 214 धावांचं आव्हान

India vs Sri Lanka Match : आशिया कपमधील सुपर-फोरमधील सामन्यात काल टीम इंडियाने पाकिस्तानचा मोठा पराभव केला. यानंतर आज टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काल तुफान फटकेबाजी करणारी टीम इंडिया आज नवख्या वेलालागेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकली. यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेला २१४ धावांचं आव्हान दिलं आहे. 

टीम इंडियाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर अवघ्या १४ तासानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ मैदान उतरला. प्रथम फलंजाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली.

IND Vs SL, Asia Cup 2023: मुंबई लोकल बनली बुलेट ट्रेन! स्लोवेस्ट २००० ते फास्टेस्ट १०००० धावा, रोहितची विक्रमी कामगिरी

श्रीलंकेचा नवखा फिरकीपटू दुनिथ वेलालागेच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. दुनिथ वेलालागेने पाच गडी बाद केले. विराट कोहली (३), रोहित शर्मा (५३), केएल राहुल (३९) आणि ईशान किशन (३३) धावांवर स्वस्तात माघारी परतले. या चौघांना वेलालागेने बाद केले. या चौघांना बाद केल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याला देखील वेलालागने बाद केले.

श्रीलंकेच्या असलंकाने रवींद्र जडेजालाही ४ धावांवर बाद केले. त्यानंतर असलंकाने जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवलाही बाद केले. आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघानी पहिले सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने मागच्या सामन्यात बांग्लादेशचा २१ धावांनी पराभव केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply