Indapur Firing : महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार; हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या युवकाची निर्घृण हत्या

Indapur Firing : इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर बाह्यवळण मार्गावर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलेल्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाची अज्ञात पाच ते सहा जणांनी गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरमधील हॉटेल जगदंबामध्ये शनिवारी सायंकाळी आठ वाजत्याच्या सुमारास अविनाश धनवे आणि अन्य तिघे असे एकूण चौघे जण जेवणासाठी थांबले. चौघेही चारचाकीने हॉटेलपर्यंत पोहोचले. चौघेही जण हॉटेलमध्ये जाऊन बसले असतानाच पाठीमागून चारचाकीने आलेल्या पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी अविनाश यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. या घटनेत अविनाश धनवे याचा जागीच मृत्यू झाला.

Badlapur Fire : बदलापुरात इमारतीला भीषण आग; घरातील साहित्य जळून खाक

अविनाश धनवे यांची निर्घृण हत्या का झाली, या संपूर्ण हत्यांकाडाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरु केला आहे.

अविनाश धनवे हा गुन्हेगार असल्याचे माहिती मिळत आहे. अविनाश आळंदीतील कोयता गँगचा म्होरक्या होता. गेल्या काही वर्षांपासून त्याची गँग सक्रिय आहे. धनवे याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी त्याने तुरुगांत इतर कैद्यासोबत मारामारी केली होती.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply