David Miller and Surya Shivan IND vs SA Super 8Image Credit source: Social Media and Bcci X Account
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 मधील तिसऱ्या आणि एकूण 43 व्या सामन्यात टीम इंडियासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहत सुपर 8 पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन सलग पाचवा सामना जिंकणार की दक्षिण आफ्रिका विजयी पंच लगावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
दक्षिण आफ्रिकेचं टॉप ऑर्डर ढेर
एडन मार्करम याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 वेगवान भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. या दोघांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी गुडघे टेकले. क्विंटन डी कॉक, एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन या तिघांनी प्रत्येकी 7-7 चेंडूंचा सामना केला. या तिघांनी 6, 4 आणि 7 अशा धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 आऊट 20 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाने कमाल केली.
दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाची कमाल
डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हीड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 187 धावांपर्यंत पोहचता आलं. डेवाल्ड आणि डेव्हीड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी स्फोटक भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी 50 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या भागीदारी दरम्यान फटकेबाजी करुन टीम इंडियाचं आणि भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवलं. या जोडीने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र शिवम दुबे याने ही जोडी फोडत टीम इंडियाची डोकेदुखी घालवली. डेवाल्डने 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 45 धावांची खेळी केली.
ट्रिस्टन स्टब्सचा फिनिशिंग टच
त्यानंतर मिलरने स्टब्स याच्यासह पाचव्या विकेटसाठी 20 बॉलमध्ये 35 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने मिलरला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिलरने 35 चेंडूत 3 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 63 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 44 धावा करत फिनिशिंग टच दिला. स्टब्सने 24 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. स्टब्सने या खेळीत 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह याने दोघांचा काटा काढला. तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान टीम इंडियाला विजयी व्हायचं असेल तर इतिहास घडवावा लागणार आहे. टीम इंडियाने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच सर्वोच्च 173 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन इतिहास घडवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



