IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये उद्या भिडण्याआधी अभिषेक शर्माविषयी, चीड येईल असं पाकिस्तानी क्रिकेटर बोलला

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना उद्या होणार आहे. श्रीलंकेत कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा नेहमीच असते. पण यावेळी वादामुळे या सामन्याबद्दल जरा जास्तच उत्सुक्ता आहे. भारत-पाक मॅचआधी दोन्ही बाजूचे माजी क्रिकेटर्स आपपाली मत मांडत असतात. पण यावेळी असं वाटतय की, यंदा पाकिस्तानात भारतीय ओपनर अभिषेक शर्माबद्दल जास्त भिती आहे. त्यामुळे अभिषेकबद्दल डिवचणारी स्टेटमेंट केली जात आहेत. भारताविरुद्ध मॅच आधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने युवा ओपनर अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. बहुतेकवेळा अभिषेक अपयशी ठरतो असं आमिर म्हणाला. एका पाकिस्तानी टीव्ही शो वर आमिरला अभिषेकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो बोलला की, ‘प्रत्येक चेंडूवर बॅट चालवण्याशिवाय त्याला काही येत नाही’

या मोहम्मद आमिरवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. मॅच फिक्सिंगमुळे अनेक वर्ष त्याच्यावर बंदी होती. त्याच आमिरने अभिषेक शर्माला बेभरवशाचा फलंदाज म्हटलं आहे. “मी आतापर्यंत जितकं पाहिलय, त्यावरुन मला तो स्लॉगर म्हणजे बेभरवशाचा वाटतो. प्रत्येक चेंडूवर तो बॅट फिरवतो. लागला तर लागला, ज्या दिवशी बॅटला चेंडू लागला तर ठीक आहे. जास्तकरुन त्याचे फेल व्हायचेच चान्सेस असतात. 8 इनिंग पैकी तो एका मॅचमध्ये धावा करतो. मला तो तांत्रिक दृष्ट्‍या योग्य फलंदाज वाटत नाही. ज्या दिवशी त्याची बॅट चालते, त्या दिवशी तो दुसऱ्या टीम्सना हैराण करु शकतो” असं मोहम्मद आमिरने म्हटलयं.

अभिषेक शर्माला आऊट करण्याची काय टेक्निक सांगितली?

हुशार गोलंदाज त्याला जाळ्यात अडकवू शकतो असं आमिरने म्हटलं. “अशा फलंदाजांना आऊट करणं सोपं असतं. तुम्ही त्यांना मुक्त फटकेबाजीची संधीच देऊ नका. जर, तुम्ही त्यांच्या शरीराजवळून स्विंग चेंडू टाकला तर तो फसणार. एका चांगल्या स्लोअर चेंडूवर सुद्धा संघर्ष करणार कारण तो जोरात शॉट मारतो” अशी मोहम्मद आमिरने अभिषेक शर्माला आऊट करण्याची टेक्निक सांगितली.

अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही ?

अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही हे अजून स्पष्ट नाहीय. USA विरुद्ध सामन्यानंतर अभिषेक आजारी पडला. त्यामुळे नामीबिया विरुद्ध सामन्यात तो खेळला नाही. 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध सामन्यावेळी अभिषेक मैदानावर उतरेल अशी अपेक्षा आहे. पण सध्यातरी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मनात अभिषेक शर्माची दहशत दिसून येतेय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *