Hunger Strike : नागरी सुविधांसाठी तळेगावकरांचे उद्यापासून उपोषण

Hunger Strike : गेल्या अनेक महिन्यांपासून करदात्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवल्याने त्रस्त नागरिकांच्या वतीने, जेष्ठ स्वातंत्र सैनिक बाळासाहेब जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून (ता.३०) नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फुले-शाहू-आंबेडकर ग्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.

गेली दोन वर्षे प्रशासकीय कामकाज सुरु झाल्यापासून तळेगाव-दाभाडे नगर परिषद हद्दीतील करदाते नागरिक अनियमित पाणीपुरवठा, खड्डेयुक्‍त रस्ते, स्वच्छतेचा अभाव तसेच आरोग्य समस्यांमुळे त्रस्त आहेत. अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करुन दररोज वेळेत पाणी पुरवठा व्हावा. भूमिगत गटार योजनेच्या सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत.

Satara : दूषित पाण्‍यासह संथ वाहते कृष्णा, वेण्‍णामाई; पालिकेकडून प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी संथगतीने

संपूर्ण शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे. नुकताच पावसाळा संपल्यामुळे गवत, झुडपे वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराईस सुरुवात झाली आहे. त्यामुळे, शहरातील ठिकठिकाणचे गवत, झुडपे काढून वेळोवेळी डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी. रस्ते, गटारे स्वच्छ असावेत आणि दररोज झाडलोट व्हावी आदी मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयासह तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जेष्ठ स्वातंत्रसैनिक बाळासाहेब जांभुळकर, माजी नगरसेवक अरुण माने, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नालबंद आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

'पावसाळा संपल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे चालू आहेत. पाणी पुरवठा देखील बऱ्यापैकी सुरळीत झाला आहे. स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणेला आणखी सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.’’



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply