Hotel Bademiya : मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेलला टाळं, FDAची कारवाई; किचनमध्ये आढळले उंदीर, झुरळे

Hotel Bademiya  Mumbai : दक्षिण मुंबईतील बडेमिया या प्रसिद्ध रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. एफडीएने हॉटेलवर छापा मारला त्यावेळी तपासणीदरम्यान हॉटेलमधील गलिच्छपणा उघड झाला आहे.

छापेमारीच्या वेळी हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे आणि उंदीर आढळले. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बडेमिया हॉटेल बंद केलं आहे. याआधी बडेमिया या हॉटेलच्या स्वच्छतेसंबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरच एफडीएने ही कारवाई केली आहे.जेव्हा FDA अधिकार्‍यांनी हॉटेलच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाला. हॉटेलकडे फूड सेफटी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचं (FSSAI) लायसन्स नसल्याचंही समोर आलं. 76 वर्ष जुन्या हॉटेलकडे हे लायसन्स नसल्याने अधिकारीही चकीत झाले.

Pune Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

पुरेशी कागदपत्र नसतानाही बडेमिया कबाब स्पेशल हॉटेलच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथे अशा दोन शाखा सुरु होत्या. रेस्टॉरंटच्या मालकाने कारवाईनंतर बोलताना म्हटलं की, त्यांच्याकडे FSSAI वगळता सर्व परवाने आहेत, जे चालू आहे. अधिकार्‍यांच्या सूचनांचे पूर्ण पालन करण्यास ते तयार असल्याचेही त्यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply