छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री ): सध्या सुरू असलेल्या भीषण इंधन टंचाईचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक फटका आता थेट आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाही बसू लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे मंगळवारी मध्यरात्री मानवतेला काळिमा फासणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी वाहतूक करणारी रुग्णवाहिका केवळ आणि केवळ डिझेल संपल्यामुळे मध्यरात्री पेट्रोल पंपावर तासनतास ठप्प पडली.
कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे संकट गडद:
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) पुरवठ्यावर कमालीचा विपरीत परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात डिझेल आणि पेट्रोलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांतील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, तर काही ग्रामीण भागातील पंप साठा संपल्यामुळे थेट बंद पडले आहेत.
मध्यरात्री मृतदेहाची झाली रखडपट्टी:
याच इंधन संकटाची भीषणता फुलंब्रीत पाहायला मिळाली, जिथे एका व्यक्तीचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका इंधन संपल्याने रस्त्यातच अडकली. चालकाने तातडीने गाडी जवळच्या पेट्रोल पंपावर आणली. मात्र, तिथे डिझेल उपलब्ध नसल्याने किंवा मर्यादित साठ्यामुळे रुग्णवाहिकेला तात्काळ डिझेल मिळू शकले नाही. त्यामुळे मृतदेह गाडीतच असताना रुग्णवाहिका मध्यरात्री पंपावर उभी करून ठेवावी लागली. यामुळे मृतकाच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या नियमाला हरताळ:
वास्तविक पाहता, राज्य शासनाच्या नियमांनुसार रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणा यांसारख्या अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांच्या वाहनांना कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने आणि राखीव साठ्यातून इंधन देणे बंधनकारक आहे. मात्र, फुलंब्री येथील या घटनेने शासनाच्या या नियमांना पेट्रोल पंप चालकांकडून कशी हरताळ फासली जात आहे, हे चव्हाट्यावर आणले आहे. जर आपत्कालीन रुग्णवाहिकांनाच वेळेवर इंधन मिळणार नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




