Pune : हिंजवडी मेट्रोबाबत ‘सीएमओ’कडून तंबी; ३१ मार्चपर्यंत १२ स्थानके कार्यरत करण्याचे आदेश

Pune : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयानेच हस्तक्षेप केला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करून पहिल्या १२ स्थानकांपर्यंत मेट्रो कार्यान्वित करा, असा सूचनावजा इशाराच 'पुणे आयटी सिटी मेट्रो' (पीआयटीसी) कंपनीला देण्यात आला आहे. मुदतीत काम पूर्ण न केल्यास 'पर्यायी' व्यवस्था करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अशी ही मेट्रो मार्गिका मार्च २०२५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. कामे अपूर्ण असल्याने मार्च २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए ) आणि 'पीआयटीसी' यांच्याकडून कामे गतीने होत नसून, स्थानकांची अनेक कामे अपुरी असल्याकडे 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम लक्ष वेधले होते. त्यानंतरही कामाचा वेग न वाढल्याने मुख्यमंत्री कार्यालयानेच दोन्ही यंत्रणांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दृष्टिक्षेपात हिंजवडी मेट्रो
२३ ---शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील एकूण स्थानके
१२ ---स्थानेक प्राधान्याने सुरू करण्याच्या ' सीएमओ 'च्या सूचना

सद्यस्थिती काय ?
हिंजवडी भागातील बऱ्याच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शिवाजीनगरपर्यंत मात्र अनेक स्थानकांमध्ये जिने, सरकते जिने व लिफ्टची व्यवस्था पूर्ण झालेली नाही.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मार्च २०२६पर्यंत नवी मुदत

वेगवेगळ्या निर्देशांमुळे संभ्रम
मुख्यमंत्री कार्यालयाने ३१ मार्चपर्यंत १२ स्थानके कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या असताना , केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत एप्रिलपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *