हर्षवर्धन सपकाळImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Harshvardhan Sapkal Criticized BJP: महाराष्ट्राचे राजकारण टिपू सुलतनाच्या वादाने ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात टिपू गाजत आहे. टिपूचा मुद्दा भाजपने अलगद टिपला आहे. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपूच्या तसबिरीवरून सुरू झालेला वाद आज रस्त्यावर आला आहे. राज्यभरात भाजप विरोधात काँग्रेस असा सामना रंगला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या विरोधात काँग्रेसची विरोधी पक्षाची भूमिका खणखणीतपणे समोर आली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपवर आसूड ओढला आहे. त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
शिवाजी महाराज काँग्रेसची आन-बाण-शान
मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आन-बान शान आहे त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगाने हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे, असे सपकाळ म्हणाले.
काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्रे प्रतिमा आहेत या कार्यालयामध्ये लावण्यात याव्या अशी मागणी होत आहे याकडे आपण कसे बघता, या प्रश्नाच्या उत्तरा दाखल माझं जे उत्तर होतं ते शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला आणि त्याच आदर्श हा टिपू सुलताननि घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत त्यासोबत लागण्याच्या अनुषंगाने समकक्षतेच्या अनुषंगाने माझे वक्तव्य केलेले आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे तो अद्वितीय हे यापूर्वी सांगितले आणि या माझ्या प्रश्नाच्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळापणा आहे, अशी टीका सपकाळांनी केली.
जात-धर्म आणणे हा त्यांचा जुना फंडा
प्रत्येक बाबतीत जात आणि प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगाने या माझ्या केलेल्या एका जबाबदारी पूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खतपाणी घालत आहे त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगाने त्यांची जी भूमिका आहे ती माफीवीरांच्या पक्षाचे असल्यामुळे आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
माझं वक्तव्य प्रश्नाचे अनुषंगाने बघितलं तर त्यात शिवाजी महाराजांचा आमचा जो स्वाभिमान आहे अभिमान त्यात अधोरेखित केला होता.. टिपू सुलतान च्या अनुषंगाने गरळ ओकत असल्याच्या सांगायचं आहे की नुकत्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्र होते आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतान चा फोटो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण आपली भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे आज याचा एक मुद्दा म्हणून काही काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा आणण्याच्या अनुषंगाने देखील कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय करतात माझ्या पुतळे देखील ते चालणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे असे सपकाळ म्हणाले.
मात्र माझा पुतळा जाळणे ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते करत असताना शिवाजी महाराज यायला आणि कावळा बसायला आणि डांग तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांचा संदर्भात अधिक जे चुकीचे सावरकरांनी व्यक्त केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे. कोश्यारी हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे देखील पुतळे जाणार आहात का ते हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे असे सपकाळ म्हणाले.
एमआयएम-भाजपचे अंडरस्टँडिंग
देवेंद्रजी आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाना थेट एम आय एम चे मतदान घेतले. चंद्रपूरमध्येही एमआयएमच्या मदतीने महापूर बसविला. महाराष्ट्रभर 21 ठिकाणी ठिकाणी एमआयएम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता युती करता मदत करता आपलं त्यांच्या अलायन्स आहे हे लपून राहिलेलं नाही आणि आपण सारख्या पक्षाशी मैत्री करतात त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे आणि असं असताना काँग्रेस सारख्या एका धर्मनिरपेक्ष पक्षाच्या अनुषंगाने आणि या देशाच्या जो मूलभूत स्वरूपाचा अभिमान आहे अशा पक्षावर आपण कुठल्याही पद्धतीची नाही हा भारताच्या संविधानामध्ये प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतो तिथे निवडणुका जिथे निवडणुकीचे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालत आहे एक ज्याचे संविधानामध्ये ज्यांच्या महामानवांचे फोटो आहेत प्रतिमा आहेत या सर्वांवर भारतीय जनता पक्ष म्हणजे थेट स्वरूपामध्ये संविधान बदलण्याच्या अनुषंगाने आणि संविधान संपण्याच्या अनुषंगाने त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचा देखील गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
[embedded content]
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




