Hardik Pandya Troll : हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Hardik Pandya Troll : आयपीएल २०२४ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या संघात रोहित शर्माचं नाव नव्हतं. त्याने रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून स्थान दिलं.

सोशल मीडियावर हार्दिक ट्रोल...

मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११ जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला ट्रोल केलं जात आहे. हार्दिक पंड्यानेच रोहितला संघात स्थान दिलं नसावं असा आरोप फॅन्सने केला आहे. सोशल मीडियावर फॅन्स संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. रोहितला या सामन्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून स्थान देण्यात आलं.

MI Vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

त्यामुळे तो पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आलाच नाही. तो थेट दुसऱ्या डावात फलंदाजीला आला. रोहितसारखा अनुभवी खेळाडू मैदानावर असायला हवा, त्याला तुम्ही बाकावर कसं बसवू शकता? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कोलकाताने केल्या १६९ धावा..

या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव अवघ्या १६९ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरने ५२ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ७० धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या मनीष पांडेने ३१ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीच्या बळावर त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाची धावसंख्या १६९ धावांपर्यंत पोहचवली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply