Hardik Pandya : हार्दिक पांड्या परतल्यानंतर कुणाचा पत्ता कट होणार ? 4 कॉम्बिनेशनची चर्चा

Hardik Pandya :  भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या  लागोपाठ तिसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या  सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पांड्याचा घोटा दुखावला होता. त्यामुळं मागील रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या  सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत मुंबईमध्ये पोहचणार आहे. पण तो श्रीलंकाविरोधात खेळण्याची शक्यता नाही. दोन नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना होणार आहे. हार्दिक पांड्या रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात टीम इंडियामध्ये परतण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर आहे. अशात हार्दिक पांड्या संघात परतल्यानंतर कुणाचा पत्ता कट होणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. 

बांगलादेशविरोधात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे टीम इंडियाला दोन बदल करावे लागले होते. मोहम्मद शामी आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले होते. शामीने दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन खळबळ माजवली. सूर्यकुमार यादव यानेही इंग्लंडविरोधात महत्वाची खेळी केली होती. त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियात परतल्यानंतर कुणाचा पत्ता कट होणार... याची चर्चा सुरु झाली आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.. काय बदल होती... याची चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर काय होऊ शकते... या चर्चेत तीन कॉम्बिनेशनची चर्चा होत आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर टीम इंडियातून कुणाचा तरी पत्ता कट होणार... ने नक्की.. पाहूयात सध्या कोणत्या तीन कॉम्बिनेशनची चर्चा सुरु आहे... 

World Cup 2023 : तेरी हार में मेरी जीत है! पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे गणित कायम! भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा

पहिले कॉम्बिनेशन - 

भारतीय संघ आठव्या क्रमांकावर शार्दूल ठाकूर याला पुन्हा संधी देऊ शकते. शार्दूल संघात परतल्यामुळे शामी अथवा सिराज यांच्यापैकी एकाला बेंचवर बसावे लागेल. त्याशिवाय सूर्यकुमार यादवच्या जागी हार्दिक पांड्या खेळेल.. म्हणजे, सुरुवातीच्या चार सामन्याप्रमाणेच टीम इंडिया मैदानात उतरले. 

दुसरे कॉम्बिनेशन - 

शामी-सिराज अन् बुमराह या तीन वेगवान गोलंदाजासह टीम इंडिया मैदानात उतरले. सूर्यकुमार यादव याच्या जागी हार्दिक पांड्या कमबॅक करेल. भारताकडे चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज.. असे पर्याय होतील. 

तिसरे कॉम्बिनेशन - 

हार्दिक पांड्या परतल्यानंतर श्रेयस अय्यर याला बेंचवर बसवले जाईल. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले. सहा गोलंदाजासह टीम इंडिया मैदानात उतरले. 

चौथे कॉम्बिनेशन - 

हार्दिक पांड्या परतल्यानंतर मोहम्मद सिराजला आराम दिला जाईल. हार्दिक पांड्या पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून काम करेल. अशा स्थितीत भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply