GST Department Pune : ७० कोटींची बनावट बिल्स सादर केलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

GST Department Pune : आय़कर विभागाने राबवलेल्या एका तपास मोहिमेमध्ये ओलायन डेस्कॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य जीएसटी विभागाच्या पुण्यातल्या टीमने ही कारवाई केली आहे. या कंपनीचे चार मुख्य पुरवठादार बनावट असल्याचं आढळून आलं आहे.

या चार पुरवठादारांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करत आपली जीएसटी नोंदणी केली आहे. याप्रकरणी या पुरवठादारांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाली. यामध्ये असं आढळून आलं की, सिराजुद्दीन कमालुद्दिन चौधरी, वय - २९ वर्षे यांनी सामानाच्या मूळ पावतीशिवाय ७०.२२ कोटी रुपयांची बनावट बिल्स सादर केली आहेत. तसंच ओलायन डेस्कन कंपनीमध्ये १२.५९ कोटींचं बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट दाखवलं आहे.

सिराजुद्दीन हा फरार होता, आणि उत्तर प्रदेशात लपला होता. त्याला पकडण्यासाठी विशेष तपास पथक तयार करुन उत्तर प्रदेशात पाठवण्यात आलं. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने शोधण्यात आलं आणि १० मार्च २०२३ रोजी त्याला अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश यांनी ट्रान्झिट रिमांड अंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्यासमोर हजर केले. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply