Ganapati Festival: ऐतिहासिक निर्णय! यंदा दगडूशेठ गणपती दुपारी ४ वाजताच विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ होणार

Shrimant Dagadusheth Ganapati Trust : यंदाचा गणेशोत्सव सोहळा अवघ्या एका महिन्यावर येवून ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय घेतला असून दुपारी 4 वाजता बाप्पाची मिरवणूक निघणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. त्यामुळे दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांचे हाल होतात.

म्हणूनच भाविकांच्या भावनांचा विचार करून ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात. अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून हा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; CM एकनाथ शिंदेही भारावून गेले

यंदा राममंदिराची प्रतिकृती...

दरम्यान, यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टकडून गणेशोत्सव काळात अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रकृती उभारण्यात येणार आहे. सध्या या मंदिराचे काम सुरू असून भाविकांसाठी ही मोठी पर्वणीच असणार आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply