
आळंदी : दोन वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा भव्य दिव्य करण्याच्या तयारीत वारकरी असताना कोरोनाचे नवं संकट वारी सोहळ्यावर घोंगावत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध लागणार का काय अशी शंका वारकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, यंदाची आषाढी वारी भव्यदिव्य काढण्याचा वारकऱ्यांनी निर्धार केला आहे.
जवळपास दोन वर्षानंतर निघणाऱ्या यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला जवळपास १५ ते २० लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. आषाढी वारी सोहळ्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट दोन वर्षानंतर आषाढी वारी सोहळा भव्यदिव्य निघण्यावर वारकरी ठाम असून राज्य सरकारने निर्बंध लावण्यापेक्षा पालखी मार्गावर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारावी अशी मागणी वारकरी करत आहेत.
कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आळंदी भक्तांविना ओस पडली होती. त्यामुळे भक्तांविना होणारी यंदाची आषाढी वारी यंदा भव्य दिव्य करण्याचा संकल्प आळंदी आणि देहु देवस्थानकडुन घेण्यात आला आहे. दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या संकटात बंद झालेली वारी यंदा भव्य दिव्य व्हावी यासाठी खरीप हंगामातील कामे मार्गी लावुन ग्रामीण भागात शेतकरी आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतो. चांगला पाऊस पडु दे, शेतशिवार हिरवागार होऊ दे, अशी विठ्ठलाकडे साकडं घालत हरिनामाचा गजर करत टाळ मृदगांच्या तालावर नाचत वारकरी पंढरीकडे जात असतो.
आषाढी वारी शेतकरी वर्गासाठी महत्वाची मानली जात असल्याने या वारीमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात सहभागी असतो. या वारकऱ्यांना पंढरीची आस लागली आहे. हा वारकरी आता थांबणार नसल्याचे वारकरी संप्रदायाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.
डोळी भरुणी पहावा अशा माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीची आस लावुन बसलेल्या लाखो वारकऱ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत. अशातच कोरोनाचं नवं संकट उभं रहात आहे. आतापर्यत वारकऱ्यांनी कोरोनाचे दोन डोस पुर्ण केले आहेत. तर बुस्टर डोस घेऊन वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होणार असून पालखी मार्गावर ठिकाणी आरोग्य यंत्रणा उभारावी अशी मागणी केली जातं आहे.
तसंच यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होत असताना आषाढी वारीवर निर्बंध लावण्यापेक्षा वारक-यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पालखी मार्गावर सक्षम आरोग्य व्यवस्था उभी केली तर विनाविघ्न आषाढी वारी सोहळा संपन्न होईल यात काही शंका नाही असा विश्वास वारकरी व्यक्त करत आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

