आळंदी : आषाढी वारी सोहळ्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट

आळंदी : दोन वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा भव्य दिव्य करण्याच्या तयारीत वारकरी असताना कोरोनाचे नवं संकट वारी सोहळ्यावर घोंगावत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध लागणार का काय अशी शंका वारकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, यंदाची आषाढी वारी भव्यदिव्य काढण्याचा वारकऱ्यांनी निर्धार केला आहे.

जवळपास दोन वर्षानंतर निघणाऱ्या यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला जवळपास १५ ते २० लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. आषाढी वारी सोहळ्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट दोन वर्षानंतर आषाढी वारी सोहळा भव्यदिव्य निघण्यावर वारकरी ठाम असून राज्य सरकारने निर्बंध लावण्यापेक्षा पालखी मार्गावर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारावी अशी मागणी वारकरी करत आहेत.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आळंदी भक्तांविना ओस पडली होती. त्यामुळे भक्तांविना होणारी यंदाची आषाढी वारी यंदा भव्य दिव्य करण्याचा संकल्प आळंदी आणि देहु देवस्थानकडुन घेण्यात आला आहे. दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या संकटात बंद झालेली वारी यंदा भव्य दिव्य व्हावी यासाठी खरीप हंगामातील कामे मार्गी लावुन ग्रामीण भागात शेतकरी आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतो. चांगला पाऊस पडु दे, शेतशिवार हिरवागार होऊ दे, अशी विठ्ठलाकडे साकडं घालत हरिनामाचा गजर करत टाळ मृदगांच्या तालावर नाचत वारकरी पंढरीकडे जात असतो.

आषाढी वारी शेतकरी वर्गासाठी महत्वाची मानली जात असल्याने या वारीमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात सहभागी असतो. या वारकऱ्यांना पंढरीची आस लागली आहे. हा वारकरी आता थांबणार नसल्याचे वारकरी संप्रदायाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

डोळी भरुणी पहावा अशा माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीची आस लावुन बसलेल्या लाखो वारकऱ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत. अशातच कोरोनाचं नवं संकट उभं रहात आहे. आतापर्यत वारकऱ्यांनी कोरोनाचे दोन डोस पुर्ण केले आहेत. तर बुस्टर डोस घेऊन वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होणार असून पालखी मार्गावर ठिकाणी आरोग्य यंत्रणा उभारावी अशी मागणी केली जातं आहे.

तसंच यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होत असताना आषाढी वारीवर निर्बंध लावण्यापेक्षा वारक-यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पालखी मार्गावर सक्षम आरोग्य व्यवस्था उभी केली तर विनाविघ्न आषाढी वारी सोहळा संपन्न होईल यात काही शंका नाही असा विश्वास वारकरी व्यक्त करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply