सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थांमधील भेसळ आणि बनावट उत्पादनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ११ लाख रुपयांचा संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये ३२ हजार ६१ लिटर खाद्यतेल आणि ३७ हजार १२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे, ज्यांची बाजारपेठेत मोठी किंमत आहे. या धडक कारवाईमुळे अन्नधान्य आणि तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
या मोहिमेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये करण्यात आलेल्या तपासादरम्यान 'जिवो' ब्रँडचे पोमेस ऑलिव्ह ऑइल (Pomace Olive Oil) म्हणून विकले जाणारे तेल प्रत्यक्षात अस्सल ऑलिव्ह ऑइल नसून ते निकृष्ट दर्जाचे किंवा साधारण शेंगदाणा तेल असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत (Laboratory Testing) उघड झाले आहे. नामांकित आणि महागड्या ऑलिव्ह ऑइलच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करून शेंगदाणा तेलाची विक्री केली जात असल्याचा हा गंभीर प्रकार एफडीएच्या हाती लागला आहे. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ पावले उचलत मुंबईतील चार प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने (Licenses) निलंबित केले आहेत.
या कारवाईचा विस्तार राज्यभरात पाहायला मिळाला. भिवंडी येथील मे. विराज एन्टरप्रायझेसमधून ११ हजार ७७९ लिटर खाद्यतेल आणि २ हजार ८५० किलो चहा असा एकूण १.२७ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागात परभणीतील तीन आस्थापनांमधून ९ हजार ३१६ किलो खाद्यतेल आणि 'मोती नमकीन'मधून २२ हजार ५५० किलो शेव-फरसाण मिश्रण जप्त करण्यात आले असून या साठ्याची किंमत ८१.७१ लाख रुपये आहे. याशिवाय धाराशिवमध्ये खवा, पेढे आणि कलाकंद, वैजापूरमधून तूप, तर सिल्लोडमधून बेकरी पदार्थ जप्त करण्यात आले. नागपूर आणि पुणे विभागातही पनीर, खवा आणि खाद्यतेलाचे मोठे साठे जप्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा एफडीए प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
महाराष्ट्र
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
- कोल्हापूर: गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबरला! शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित; फुटीच्या भीतीने काँग्रेस संचालक सहलीवर जाणार!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!


























Subscribe to my channel




