
मुंबई : महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत (Marathi Name Plate) अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिक्षेत्रात मराठी नामफलकासाठी (Marathi Name Plate) मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक ३० जून २०२२ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, दिनांक १७ मार्च २०२२’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन(सुधारणा) अधिनियम, २०२२’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे.
अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे.तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.
अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापाऱयांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार आपल्या दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा.
वाढीव मुदतीत देखील कार्यवाही न करता, अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


