मुंबई ,उल्हासनगर: : गावठी दारू बनवण्यासाठी वापरला जाणारा काळा गुळ जप्त; हिल लाईन पोलिसांची कारवाई

उल्हासनगर: गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा काळा गुळ उल्हासनगरच्या  हिललाईन पोलिसांनी जप्त केला आहे. या काळ्या गुळाची ८ लाख ७० हजार एवढी असून या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे. 

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेम नगर परिसरात तरुण चांदवानी नावाच्या व्यक्तीने एका दुकानात काळा गुळ साठवून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक पोपट करडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हिललाईन पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या दुकानावर धाड टाकली. या दुकानातून तब्बल ४८० गोण्या काळ्या गुळाने भरलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी तरुण चांदवानी याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *