England vs Nepal Match Result T20i World Cup 2026Image Credit source: England Cricket X Account and Social Media
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड त्यांच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठ्या उलटफेरची शिकार होता होता राहिली. इंग्लंडने नवख्या असलेल्या नेपाळसमोर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेपाळने या धावांचा पाठलाग करताना सडेतोड बॅटिंग करत शेवटपर्यंत जोरदार लढा दिला. नेपाळच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. नेपाळला मोठा उलटफेर करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. नेपाळने शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र सॅम करन याने चिवट बॉलिंग केली. सॅमने 9 धावांचा यशस्वी बचाव केला. नेपाळला शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज होती. तेव्हा सॅमने हुशारीने बॉल टाकला आणि अवघी 1 धाव दिली. इंग्लंडने अशाप्रकारे आपली लाज राखली आणि 4 धावांनी विजय मिळवला. तर नेपाळची झुंज अपयशी ठरली. मात्र नेपाळने या कामगिरीसह चाहत्यांची मनं जिंकली.
सामन्याचा धावता आढावा
इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंग केली. इंग्लंडसाठी जेकब बेथल आणि कॅप्टन हॅरी ब्रूक या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. जेकबने 55 आणि हॅरीने 53 धावांची खेळी केली. जोस बटलर याने 26 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी विल जॅक्स याने 18 बॉलमध्ये 39 रन्सची खेळी करत फिनिशिंग टच दिला. इंग्लंडने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. नेपाळसाठी दीपेंद्र सिंह आयरी आणि नमन यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
नेपाळची चाबूक सुरुवात
कुशल भुरटेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने 185 धावांचा पाठलाग करताना नेपाळला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पावरप्लेचा फायदा घेत नेपाळला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र आसिफ नेपाळच्या 37 धावा असताना आऊट झाला. आसिफने 9 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर कुशलही बाद झाला. कुशलने 29 धावांचं योगदान दिलं.
रोहित आणि दीपेंद्रची निर्णायक भागीदारी
त्यानंतर दीपेंद्र सिंह आयरी आणि कॅप्टन रोहित पौडेल या दोघांनी धमाका केला. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीची धुलाई करत नेपाळच्या विजयाचा दावा मजबूत केला. मात्र निर्णायक क्षणी इंग्लंडने नेपाळला झटपट 2 झटके दिले. इंग्लंडने या सेट जोडीला आऊट केलं. दीपेंद्र 44 आणि रोहित 39 रन्स करुन माघारी परतले. त्यामुळे नेपाळच्या विजयाची आशा काही प्रमाणात कमी झाली. मात्र लोकेश बाम याने इंग्लंडचं टेन्शन वाढवलं.
लोकेश बामची झुंजार खेळी व्यर्थ
लोकेशने आरिफ शेख आणि गुलशन झा या दोघांच्या मदतीने किल्ला लढवला आणि नेपाळला शेवटपर्यंत सामन्यात कायम ठेवलं. लोकेशच्या या खेळीमुळेच इंग्लंडची पाचावर धारण झाली होती.
नेपाळला विजयासाठी 48 धावांची गरज असताना लोकेशने चाबूक बॅटिंग केली. नेपाळने 18 व्या षटकात 22 धावा केल्या. तर 19 व्या ओव्हरमध्ये 14 रन्स केल्या. लोकशेने केलेल्या फटकेबाजीमुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. नेपाळला आता 6 बॉलमध्ये 10 रन्स हव्या होत्या. मात्र सॅम करन याने अनुभवाच्या जोरावर शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावाच दिल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 4 धावांनी सामना जिंकत विजयी सलामी दिली आणि उलटफेर होण्यापासून आपली लाज राखली.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



