
Employee Strike : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यातील प्रमुख शहरातील प्रशासकीय यंत्रणा खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. अशातच संप सुरू होऊन दोन दिवसाचा कालावधी उलटलेला असतानाच संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे. ठाणे आणि सोलापूर पाठोपाठ आणखी एका कर्मचारी संघटनेनं संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी संपातून माघार घेतली आहे. या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता केवळ काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, फेडरेशनने याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रद्वारे कळवलं आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी १४ मार्च २०२३ रोजी पुकारलेल्या संपाबाबत दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ आपणास संपात सहभागी होणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं. त्यानुसार फेडरेशनने १४-१५ मार्च रोजी काळ्या फिती लावून संपात सहभाग घेतला.
आज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा झाली. त्यांनी फेडरेशनला पाठवलेल्या पत्रानुसार लवकरच फेडरेशन पदाधिकाऱ्यांना चर्चेकामी वेळ देण्याचं ठरवलं असून याबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या अनुशंगाने आमची राज्यातील प्रतिनिधींशी चर्चा झाली असून उद्या दिनांक १६ मार्च २०२३ पासून राज्यातील महापालिकेतील सर्व कर्मचारी प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती लावून सेवा देतील, असं फेडरेशनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळं सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयं ओस पडल्यामुळं प्रशासकीय कामकाज खोळंबलेलं आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी देखील संपात सहभागी झाल्यामुळं त्याचा मोठा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कर्मचारी संघटनांशी चर्चा करून जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


