Employee strike : राज्यातील 2 लाख कर्मचारी आजपासून संपावर राज्यातील 2 लाख कर्मचारी आजपासून संपावर

Employee strike : राज्यातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक हे उद्यापासून (ता.१८) ते २० डिसेंबरदरम्यान संपावर जाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण व दुर्गम भागातील गावातील समस्या स्वातंत्र्यानंतरही तशाच आहे.

Ahmednagar : ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला; क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपलं

शासनाने ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे, गावात शहरासारख्या सुविधा द्याव्यात, सरपंचासह कमचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन द्यावे, ग्रामपंचायत विभागातून किमान सहा आमदार निवडून जावेत, विधान परिषदेचया निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा, मुंबईत सरपंच भवन असावे.

ग्रामपंचायत कमचाऱ्यांना नगरपालिका कर्मचारयांचा दर्जा देवून त्याप्रमाणे वेतन द्यावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रकरून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे रद्द करावीत, विनाकारण कामावरून कमी कलेलया ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी तीन दिवस संप पाळण्यात येणार आहेत.

या संपास विविध संघटनांनी, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार ग्रामसेवक संघटनेचाही पाठींबा आहे. अशा प्रकारच्या संपामुळे गावातील गावगाडयाचा कारभार ठप्प होणार आहे. यामुळे शासनाचा महसूल वसूलीसह विविध कामांवर विविध कामांवर विपरीत परिणाम होणार आहे.

असे कर्मचारी आहेत संपावर

ग्रामसेवक : २५ हजार

ग्राम रोजगार सेवक : २१ हजार

संगणक परिचालक : २२ हजार

कर्मचारी : १ लाख

जळगाव जिल्ह्यातील संप काळातील कर्मचारी

ग्रामपंचायती : ११५१

रोजगार सेवक : ८००

ग्रामसेवक : ८००

संगणक परिचालक : ८३७

कर्मचारी : १०००



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply