Eknath Shinde : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांना मोठी मदत, मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पालकत्व

Landslide News :  खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी येथे जाऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली.

नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत.

तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजून ८६ जण अडकल्याची माहिती मिळत आहेत.

Pune Zilla Parishad School : पुणे जिल्ह्यातल्या १६ शाळा अनधिकृत, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची जबाबदारी घेण्यात येणार आहे. मुलांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत फाऊंडेशन सहकार्य करेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांना घरे बांधून देण्याचे सांगितले आहे.

अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.

हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply