Eknath Shinde : …तर शिंदेंना एकही पालिका जिंकून देणार नाही, नाईकांचं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज

image

Maharashtra local body politics Shinde vs Naik : एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील ठाणे-नवी मुंबईतील वाद आणखी चिघळलाय. मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा थेट इशारा दिला आहे. माझ्या नादाला लागाल तर अस्तित्व संपवेन, असा थेट इशारा नाईकांनी शिंदे पिता-पुत्रांना दिला आहे. नाईकांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे आणि कल्याणमधील जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माझ्या नादाला लागले तर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची एकही महापालिका येऊ देणार नाही, श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन. कल्याण-ठाण्यातील जनता शिंदेंना संपवेल, असे गणेश नाईक म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. गणेश नाईक यांनी शिंदे पिता-पुत्रांना थेट आव्हान देत ठाणे जिल्ह्यातून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा इशारा दिला आहे. "माझ्या नादाला लागाल, तर ठाणे जिल्ह्यातून तुमचं अस्तित्व संपवून टाकेन," अशा कठोर शब्दांत नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *