
औरंगाबाद : सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या (मॉर्निंग वॉक) महिला, पुरुष नागरिकांना लक्ष्य करत तोंडाला रुमाल बांधून मोबाइल हिसकावण्याच्या घटना शहर परिसरात समोर आल्या होत्या. तपासादरम्यान मुकुंदवाडी पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांपैकी एका परप्रांतीय संशयित आरोपीला थेट सातारा जिल्ह्यात जाऊन मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
विजय विनोद आघाम (२४) आणि अमित ऊर्फ बबुवा रामनयन चौधरी (२२, रा. दोघेही रा. जगताप शाळेजवळ, राजनगर, मुकुंदवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यापैकी संशयित विजयला १७ ऑगस्टला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. संशयितांकडून पोलिसांनी एका मोबाइलसह दुचाकी असा ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-२ परिसरातील महिला सुरेखा बोरडे या सात एप्रिल रोजी ठाकरेनगर रस्त्याने पायी फिरत होत्या, तसेच अनिल मानकर (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) हे पहाटे सिडको स्थानकावर उतरून पाहुण्यांकडे जयभवानीनगरकडे जाण्यासाठी रस्त्यावर आले आणि त्यांनी फोनवर पत्ता विचारत असतानाच आरोपींनी त्यांचा मोबाइल हिसकावला होता. तसेच सुरेखा यांचाही मोबाईल ठाकरेनगर रस्त्यावर हिसकावला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील आरोपीपैकी एकजण जगताप शाळेजवळ मित्राची वाट बघत उभा असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, विशेष पथकाचे अधिकारी तथा उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांनी पथकासह सदर ठिकाणी धाव घेतली असता पोलिसांना पाहताच आरोपी विजय आघामने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आघामच्या कोठडी २१ ऑगष्टपर्यंत वाढ करण्यात आली. तसेच आरोपी चौधरीला २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दुसऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक
विशेष म्हणजे मोबाइल चोरी प्रकरणातील दुसरा परप्रांतीय आरोपी चौधरी याच्या मदतीने आपण चोरी केल्याची कबुली आघाम याने दिली. मात्र चौधरी हा सापडत नव्हता. त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या पत्नी, मुलीला औरंगाबादेतच ठेवून स्वतः सातारा जिल्ह्यातील वडूज येथे एका ठेकेदाराकडे फरशी बसविण्याचे काम करत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी १७ ऑगस्टला रात्री पोलिस सातारा जिल्ह्याकडे रवाना झाले. त्याला वडूज येथून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक मोबाईल, एक मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई विशेष पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अंमलदार मनोहर गीते, अनिल थोरे, संतोष भानुसे, गणेश वाघ, श्याम आढे यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.
शहर
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
महाराष्ट्र
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



