Eknath Khadse Call CM Eknath Shinde : “तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”, एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन भावनिक संवाद

Eknath Khadse Call CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली. आता एकनात खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत जी मदत केली त्याबद्दल आभार मानले आहेत. माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं असं म्हणत खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने केली व्यवस्था

एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावाता होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसेंसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar : काम बंद आंदोलन नडलं! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 90 कंत्राटी कर्मचारी बडतर्फ; मनपा प्रशासकांची मोठी कारवाई

काय म्हणाले एकनाथ खडसे?

“आपला छोटाच विषय होता. आपल्या दृष्टीकोनातून बहुदा फार मोठाही नव्हता. मला एअर अँब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळालं. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज १०० टक्के आणि तिसरा ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. कार्डिअॅक अरेस्ट आला.. माझं हृदय १०० टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!” असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply