सिंधुदुर्ग (आंबोली): पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली घाटातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी १२०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१, रा. गावठणवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. राजाराम हा मायकल डिसोजा यांच्या मालकीचा डंपर चालवत असे. सोमवारी रात्री राजाराम कामावरून घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी आणि डंपर मालकांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान, आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात त्यांचा डंपर बेवारस अवस्थेत उभा असल्याचे दिसून आले.
रात्रभर डंपर एकाच जागी उभा असल्याने आणि राजारामचा कोणताही पत्ता लागत नसल्याने संशय बळावला. अखेर मंगळवारी प्रशासनाच्या मदतीने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून दरीत शोध घेण्यात आला. तेव्हा १२०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह आढळून आला. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने अत्यंत कष्टाने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. राजारामने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
महाराष्ट्र
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


