Mumbai Accident: लालबागमध्ये भीषण अपघात, मद्यधुंद प्रवाशाचा थिल्लरपणा, बसने ९ जणांना चिरडलं

Lalbaug : मुंबईमध्ये भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव बसने ९ जणांना चिरडले. लालबाग परिसरात रविवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर ८ जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी एक जणाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सव्वा आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बेस्ट बसची मार्गिका क्रमांक ६६ नंबरची बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला. ही बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. यावेळी ही बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मद्यधुंद प्रवाशाने काही क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.

Vanraj Andekar : आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार; जीवघेणा हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू

हा प्रवासी थेट चालकाच्या केबिनजवळ गेला. प्रवाशाचे बस धावत असताना चालकाला स्टेअरिंगवरून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने डाव्या बाजूने बसचे स्टेअरिंग हातात घेत ते फिरवले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले.

अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना त्यांनी तात्काळ केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. या भीषण अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. जखमी पादचाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर केईएमच्या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. श्रेया मणियार आणि नुपुरा मणियार असं त्यांची नावं आहेत.

या भीषण अपघातामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कार आणि दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांनी हा अपघात ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply