Dombivli Fire : कंपनीत पहिला स्फोट कशामुळं झाला? डोंबिवली आगीच्या घटनेवर बोलताना CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

Dombivli Fire : डोंबिवलीतील एमआयडीसीत कंपनीत झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली, असं शिंदे यांनी सांगितलं.

कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. सर्वच यंत्रणा तिथे पोहोचली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Shirur : दुर्देवी घटना! मामाच्या गावी आलेल्या भावंडांवर काळाची झडप; शेततळ्यात बुडून सख्या भावांचा मृत्यू

डोंबिवलीतील घटना वेदनादायक- देवेंद्र फडणवीस

डोबिंवलीतील दुर्घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या आगीत 8 जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचतील. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आलं आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसी फेज २ मध्ये भीषण स्फोट झालं आहे. अनुदान केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. या दुर्घटनेत ५- ६ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply