Dhule News : ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

Dhule News : धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार हायस्कूल समोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला आहे. परिसरातील संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या दोन्ही काचा फोडल्या असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत

ट्रक खाली चिरडून मृत्युमुखी पडलेला तरुण हा 18 ते 20 वयाचा असून वाहनावरून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची माहिती देवपूर पोलीस घेत असून, या अपघातानंतर परिसरात एकच खबाळ उडाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु देवपूर पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असून सध्या तणावपूर्ण शांतता परिसरात बघावयास मिळत आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *