Dhule News : गो तस्करी रोखण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना; आतापर्यंत ३० कारवाया

Dhule News : अनेकदा कारवाई झाल्यानंतर गो तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र ही गो तस्करी रोखण्यासाठी पोलीस दलातर्फे गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून गोरक्षकांकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे.

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून गो तस्करीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्याला आटोक्यात आणण्यासाठी  पोलीस अधीक्षकांतर्फे ठोस भूमिका घेत गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून गो तस्करांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस  प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करी विरोधात प्रतिबंध करण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे. 

Ashok Chavan : पक्षासाठी मी खूप काही दिलं, पण..., भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

सेलच्या माध्यमातून ३० कारवाया  

या सेलसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून जिल्ह्याभरामध्ये होत असलेली गो तस्करी रोखली जाणार आहे. या संदर्भात सेलच्या माध्यमातून ३० वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली असून, जवळपास ४५ जणांच्या विरोधामध्ये प्रतिबंधकात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षकांतर्फे देण्यात आले आहेत. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply