Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर

Dharashiva : धाराशिवच्या कळंब येथील महिला हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात बीड कनेक्शन उघड झाले आहे. महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एसीबीने अटक केली. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असे आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी उस्मान गुलाब सय्यदला देखील पोलिसांनी अटक केली. महिला हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे बीडमधील आहेत. या हत्या प्रकरणात बीड कनेक्शन उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणारा असल्याचा आरोप होत आहे. अनैतिक संबंधातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप करण्यात येत आहे. आता या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर भोसले यांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी हे बीडच्या केजमधील आहेत. या हत्या प्रकरणी कळंब पोलिसांनी पहाटे ५ वाजता दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

दरम्यान, कळंब येथील मनिषा कारभारी बिडवे हत्या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मृत महिलेचा संबध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार होते. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत मनिषा बिडवे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
 

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनिषा बिडवेंची चौकशी झाली होती. त्यामुळे कराडच्या काळ्या कारनाम्यामध्ये ही महिला सहभागी असल्याची चर्चा होती. त्यामुळे कराडचे काळे कारनामे समोर येऊ नये म्हणून मनिषा बिडवे या महिलेची हत्या झाली की पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामागे अनैतिक संबंधच होते अशा चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे महिलेच्या मृत्यूच्या मुळाशी जाऊन पोलिस या प्रकरणात सत्य शोधणार की हे प्रकरण थंड बस्त्यात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply