Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून (3 जानेवारी) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

Ashok Chavan News : 'भाजपमध्ये कोण- कोण जाणार? नावे जाहीर करावी...' अशोक चव्हाणांचे विखे पाटलांना आव्हान

शासन दरबारी धनगड अशी नोंद असून, राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्वाची समजली जात आहे. सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply