Devendra Fadnavis : आमच्याजवळही बॉम्ब आहेत, योग्य वेळी फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. विरोधक बॉम्ब म्हणत आहे ते लवंगी फटाकेही नाहीत, आमच्याकडेही बॉम्ब आहेत आम्ही ते योग्य वेळी फोडू असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे. दरम्यान सभागृहात सीमावादावर बोलणाऱ्यांनी अडीच वर्षात काहीच केलं नाही असा टोला हा देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कुठलही प्रकरण काढायचं आणि त्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही हा अशाप्रकारचा प्रयत्न दिसतो आहे. आतापर्यंततरी हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू असं फडणवीस म्हणाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव मांडतील. मला आशा आहे की हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्यावेळे त्यांनी काहीच केलं नाही. आमचे सरकार आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. निर्माण झालेला नाही. सीमाप्रश्न आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे. तेव्हापासून वर्षानुवर्षे ज्यांची सरकारं आहेत, ते आता असं भासवत आहेत जणूकाही हे सरकार आल्यानेच सीमाप्रश्न तयार झाला असे फडणवीस म्हणाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply