कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय

कोल्हापूर: शहरात भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्यामागे खासगी सावकारी किंवा पैशांच्या व्यवहारातील वाद कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक देवाणघेवाणीवरून निर्माण झालेल्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *