Dapoli News : अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद

Dapoli News : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला. परिणामी दरडीचा काही भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा भाग खचू लागला आहे. यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे येत आहे. ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे.

Akola Corporation : सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा अपहार; अकोला मनपाच्या सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल

रविवारी देखील दापोलीतील जामगे गावातील रस्ता खचला. या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्‍या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचला. यामुळे रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्या रत्नागिरी येथील खेड शहरात मंगळवारी दुमजली इमारत कोसळली. खेड शहरातील हमदुले चाळ येथे ही घटना घडली. खेड नगरपालीकेने धोकादायक इमारत म्हणून मे महिन्यात इमारत रिकामी केली हाेती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply