CSK विरूद्ध विराटला रोहित सारखा ‘विक्रम’ करण्याची संधी

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होत आहे. या सामन्याकडे फाफ ड्युप्लेसिसची आरसीबी आणि रविंद्र जडेजाची सीएसके असेच पाहिले जाते. मात्र या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली एक खास विक्रम करू शकतो. हा विक्रम करण्यासाठी त्याला सीएसके विरूद्ध 52 धावांची खेळी करावी लागेल.

विराट कोहली हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 6389 धावा केल्या आहेत. तसेत त्याने 2016 च्या हंगामात 950 धावा ठोकून एक मोठा विक्रम केला होता. आता विराट कोहलीचे लक्ष चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध 1000 धावा पूर्ण करण्यावर असणार आहे. विराट कोहलीला सीएसके विरूद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 52 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे आयपीएल हंगामात एखाद्या संघाविरूद्ध 1000 धावा करणारा विराट कोहली हा दुसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएल इतिहासातील एका संघाविरूद्ध 1000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज आहे. दरम्यान विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात 48 धावांची खेळी केली होती. त्याचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले होते.

आरसीबीने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. सध्या ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी पाठोपाठ 4 सामने गमावले आहेत. त्यातच आता आरसीबीसाठी जॉश हेजलवूड आणि जेसन बेहरनफोर्ड हे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आरसीबीच्या संघाची ताकद अजूनच वाढणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply