Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Crime News : पुण्यात टोळी युद्धाने डोकं वर काढल्याचं चित्र दिसून येत आहे. वनराज आंदेकरच्या हत्येच्या बरोबर एक वर्षानंतर त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली. अशीच घटना पनवेल मध्ये खुटारी गावात घडली आहे. गुंड राजकुमार म्हात्रेवर तथाकथित गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांनी जीवघेणा हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत आरोपींनी रिव्हॉल्वर, तलवार आणि हॉकी स्टिकसारख्या घातक शस्त्रांचा वापर केला. हल्ल्यात राजकुमार म्हात्रे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर तळोजा पोलिसांनी वेगाने कारवाई करत अनिकेत म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पनवेल परिसरातील गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांची वाढती दहशत यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील आंदेकर हत्याकांडाने गुन्हेगारी टोळ्यांच्या वैराचे स्वरूप सर्वांसमोर आणले होते. त्याच धर्तीवर पनवेलमध्येही अशाच प्रकारचे गँगवारचे वातावरण तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"गोल्डन मॅन" म्हणून प्रसिद्ध असलेला अनिकेत म्हात्रे हा या गुन्हेगारी जाळ्याचा भाग असल्याच्या आरोपांमुळे त्याची भूमिका अधिक संशयास्पद ठरली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर खुटारी गाव आणि आसपासच्या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान पनवेलमध्ये काही महिन्यांपूर्वी भर दिवसा बाईक वरून आलेल्या काही तरुणांनी गोळीबार केला होता. या सतत घडणाऱ्या घटनांनंतर पनवेल शहर सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

  1. Arrive in comfort with our exclusive Private Airport Shuttle Baha Mar. We specialize in reliable and luxurious Baha Mar Transportation, ensuring every guest enjoys a smooth ride from Nassau Airport to Grand Hyatt, SLS, or Rosewood Baha Mar.

Leave a Reply to baha mar transportation Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *